धकाधकीच्या जीवनात आजकाल महिलांना स्किनकेयर आणि ब्युटी रुटीनकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. कधी कधी वेळ असल्यावरही कंटाळा करतात. त्यातल्या त्यात महिला जर वर्किंग असल्या तर, त्यांना घर आणि ऑफिस अशा दोन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. अशा परिस्थितीत स्वतःच्या स्किनकेयर आणि ब्युटी रुटीनकडे लक्ष देणे, आव्हानात्मक आहे. त्वचा आणि वैयक्तिक सौंदर्यप्रसाधने ही केवळ तरुण दिसण्यासाठीच महत्त्वाची नाहीत तर ती आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. हे सत्य कुणीही नकारू शकत नाही की, स्किन केयर आणि ब्युटी रुटीन तुमच्या आत्मविश्वासासाठी देखील खूप महत्त्वाचे आहे.
Also Read: पिरेड्समध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळावा म्हणून महिला घेतात 'या' थेरेपीज, जाणून घ्या सविस्तर
मात्र, दररोज यासाठी जास्त वेळ घालवणे शक्य नाही. म्हणून तुम्हाला एक साधी आणि कमी वेळ घेणारी ब्युटी रुटीनची गरज आहे. होय, तुम्हाला तुमच्या संपूर्ण दिवसातून फक्त 15 मिनिटे तुमच्या त्वचेसाठी द्यावी लागतील, जेणेकरून तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि कॉन्फिडेंट राहाल. जाणून घेऊयात सोपी ब्युटी रुटीन-
क्लिंजिंग
क्लिंजिंग करणे हा चेहरा स्वच्छ करणे ही पहिली स्टेप आहे. यासाठी सकाळी उठताच प्रथम तुमचा चेहरा सौम्य फेसवॉशने धुवा. यामुळे रात्रीतून त्वचेवर साचलेले अतिरिक्त तेल स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावर ताजेपणा येईल. यासाठी तुम्हाला सुमारे दोन ते तीन मिनिटे लागतील.
टोनिंग
चेहरा धुतल्यानंतर टोनिंग करणे आवश्यक आहे, यामुळे त्वचेचे पोअर्स टाईट होतात, त्वचेचा टोन दिसून येतो. याने त्वचेचा PH देखील संतुलित होतो. यासाठी, तुमच्या चेहऱ्यावर गुलाबजल स्प्रे करा आणि नंतर ते असेच ड्राय होऊ द्या. यासाठी तुम्हाला अगदी कमी वेळ लागणार आहे.
मॉइश्चराइजिंग
टोनिंग केल्यानंतर, त्वचेला हायड्रेट करण्याची वेळ आली आहे. यासाठी तुम्ही हवामान आणि त्वचेच्या पोतानुसार ऑईली किंवा ड्राय असे मॉइश्चरायझर लावू शकता. जेल किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर वापरण्याचा प्रयत्न करा, ते त्वचेत लवकर शोषले जातात आणि ऑईली वाटत नाहीत. त्याचबरोबर त्वचा हायड्रेटेड आणि ताजी दिसते, यासाठी तुम्हाला एक मिनिटही लागेल.
सनस्क्रीन आहे महत्त्वाची
ऑफिससाठी दररोज बाहेर जावे लागते, म्हणूनच उन्हामुळे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी सनस्क्रीन लावणे खूप महत्वाचे आहे. म्हणून दररोज संपूर्ण चेहऱ्यावर तसेच मानेवर किमान SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेली सनस्क्रीन लावा. यासोबतच, सन प्रोटेक्शन लिप बाम अप्लाय करा.
अवघ्या काही मिनिटांत मेकअप लुक
मेकअपमध्ये हेवी बेस मेकअप करण्याची गरज नाही. लाईट मेकअपसाठी सर्वप्रथम थोडे BB क्रीम घ्या आणि अप्लाय करा. यासाठी तुम्ही ब्लेंडर ब्रश देखील वापरू शकता. त्यानंतर, काजळ आणि लिप बाम किंवा लिपस्टिक अप्लाय करा. तसेच, डोळ्यांवर लाइनर लावण्याऐवजी फक्त ट्रान्सपरंट मस्कारा लावा. अशाप्रकारे, तुम्हाला पूर्णपणे नैसर्गिक आणि फ्रेश लूक मिळेल. हेयरस्टाईलसाठी पोनीटेल बनवणे, अगदी सोपी आणि कमी वेळ घेणारी हेयरस्टाईल आहे.